दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदमांना जामीन नाहीच

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अटकेत असलेले सदानंद कदम यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.कदम हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांच्या समोर झालेल्या सुनावणीवेळी सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.या अर्जावर न्यायालयाने तीन महिन्यानंतर हा आपला निर्णय जाहीर केला. साई रिसॉर्ट बांधकाम करताना आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कदम यांच्यावतीने अ‍ॅड.सचिन हांडे यांनी तर देशपांडे यांच्यावतीने अ‍ॅड. सुबीर सरकार यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.या अर्जावर सुनावणी पूर्ण होऊनही निकाल मात्र विशेष पीएमएलए न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांनी २१ जून रोजी तीन महिन्यासाठी राखून ठेवला होता.त्यावर काल मंगळवारी सुनावणी होऊन दोघांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top