दारू आणि पान मसाल्याच्या जाहिरातींना अल्लू अर्जुनचा नकार

मुंबई –

तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनला पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर जाहिरातींसाठी करारबद्ध करण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र, अर्जुनने नुकत्याच एका मोठ्या कंपनीला जाहिरातीसाठी नकार दिला आहे. कारण ही कंपनी दारू किंवा पानमसालाची उत्पादक आहे. मोठ्या पडद्यावर जरी आपण अशा भूमिका साकारत असलो तरी प्रत्यक्षात शरीराला अपायकारक ठरतील अशा गोष्टींचा प्रसार करणार नाही असे अल्लू अर्जुन याने सांगितले.

आगामी पुष्पा-२ चित्रपटामध्ये एका प्रसिद्ध दारू आणि पानमसाला कंपनीने त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चित्रपटात जेव्हा केव्हा पुष्प राज दारू किंवा पानमसाला खाईल तेव्हा आपल्या उत्पादनाचेनाव दिसावे, अशी कंपनीची इच्छा होती. यासाठी अर्जुनला १० कोटींची ऑफर देण्यात आली होती, मात्र अल्लू अर्जुन याने ही ऑफर नाकारली. त्याने सांगितले की, ‘अशा उत्पादनांच्या सेवनासाठी मी लोकांना प्रोत्साहित करू इच्छित नाही. माझ्या चाहत्यांना अशा वाईट सवयी लागाव्यात, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी हा प्रस्ताव नाकारला. मी स्वत: तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खात नाही, अशी व्यसने तरुणाईला लागू नयेत, असे मला वाटते.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top