दिल्लीतील पर्यटनाला प्रदूषणाचे ग्रहण टूर आणि ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम

नवी दिल्ली –
वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीतील पर्यटनाला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. प्रदूषणामुळे विदेशी पर्यटकांच्या सहलींच्या वेळापत्रकात बदल होणे आणि सहली रद्द करणे, त्यामुळे टूर आणि ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. दिल्लीतील विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांची कमी झाली आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्रायल, मेक्सिकोसह इतर देशांचे पर्यटक दिल्लीत येणे टाळत असून ते हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, गोवा आणि लडाखला जाणे पसंत करत आहेत. दिल्ली टॅक्सी आणि टुरिस्ट ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष संजय सम्राट म्हणाले की, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विदेशी पर्यटक सर्वाधिक येतात. मात्र यावर्षी या कालावधीत पर्यटकांचा ओघ 30 टक्क्यांनी कमी झाला आहे.
सरोजिनी नगर ट्रॅव्हल एजंट सुमित यांनी सांगितले की, जे पर्यटक दिल्लीला येण्याचे ठरवत होते, ते वायू प्रदूषणामुळे येण्यास टाळत आहेत. दिल्लीची तिकिटेही रद्द केली जात आहेत. प्री-बुक केलेल्या गाड्याही रद्द केल्या जात आहेत. विदेशी पर्यटक गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना प्राधान्य देत आहेत, जिथे हवा दिल्लीपेक्षा खूप स्वच्छ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top