Home / News / दिल्लीत ‘ईडी’च्यापथकावर हल्ला

दिल्लीत ‘ईडी’च्यापथकावर हल्ला

नवी दिल्ली -सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (ईडी) पथकावर हल्‍ला झाल्‍याची घटना आज दिल्‍लीत घडली. सायबर गुन्ह्याशी संबंधित पीपीपीवायएल सायबर ॲप फसवणूक प्रकरणी...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली -सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (ईडी) पथकावर हल्‍ला झाल्‍याची घटना आज दिल्‍लीत घडली. सायबर गुन्ह्याशी संबंधित पीपीपीवायएल सायबर ॲप फसवणूक प्रकरणी छापा टाकण्‍यासाठी ईडीचे पथक आज सकाळी दिल्लीतील बिजवासन परिसरात गेले होते. यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाने पथकावर हल्‍ला केला. यात ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. यासोबतच ईडीच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या