Home / News / दिल्लीला प्रदूषणाचा मोठा विळखा सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल

दिल्लीला प्रदूषणाचा मोठा विळखा सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो अधिकच आवळत चालला आहे. दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो अधिकच आवळत चालला आहे. दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा हवे तेवढा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे आता सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री आतिशी यांनी ही घोषणा केली.सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलल्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदुषणही काही प्रमाणात नियंत्रणात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. आतिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,आता दिल्ली महापालिकेचे काम सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ यावेळेत सुरू राहील. तर केंद्र सरकारची कार्यालये सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहतील.प्रदुषणामुळे सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे दिल्लीती शाळांमध्ये इयत्ती पाचवीपर्यंतच्या शाळा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. सहावीपुढील वर्गातील विद्यार्थ्यांनाच शाळेत जावे लागेल.यापूर्वी प्रदुषणामुळे शाळांचे वर्ग ऑनलाईन घेतले जात होते. तसेच सहावीच्या वर्गावरील मुलांना चेहऱ्यावर मास्क सक्तीचा केला आहे. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणे बंद केले असून त्यांना वाचन, चित्रकला, हस्तकला, बुद्धिबळ व कॅरम आदी उपक्रमासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
याव्यतिरिक्त पालिकेकडून मोठ्या रस्त्यांवर दररोज पाण्याचे फवारे मारण्यात येणार आहेत.तसेच प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस वगळता सीएनजी व डिझेलवरील बसेसना दिल्लीत येण्यास बंदी केली आहे.त्याचप्रमाणे खोदकाम,
बांधकामांवरही बंदी घातली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या