दिल्ली विधानसभेला 30 वर्षे पूर्ण आमदार निधीत 3 कोटींची वाढ

नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. दिल्ली सरकारने आमदारांच्या वार्षिक निधीत वाढ केली असून आमदार निधी 4 कोटींवरून 7 कोटी रुपये करण्यात आला.याबाबत प्रस्ताव विधानसभेत ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव एकमताने विधानसभेत मंजूर करण्यात आला.
दिल्ली विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आज सकाळी सुरू झाले. दिल्लीचे शहरी विकास मंत्री सौरभ भारद्वाज यांनी विधानसभेत सांगितले की, आमदारांनी निधी वाढवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरुन दिल्ली सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. आज विधानसभेत हा प्रस्ताव आणला. प्रत्येक आमदारांना स्थानिक क्षेत्र विकास निधी 4 कोटी रुपयांवरून 7 कोटी रुपये देण्यात येणार आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार निधीचे वाटप केले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top