Home / News / दिवाळीनिमित्त कोकण रेल्वेच्या दोन विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त कोकण रेल्वेच्या दोन विशेष गाड्या

सिंधुदुर्ग- कोकण रेल्वे मार्गावर होणारी दिवाळी सणातील गर्दी लक्षात घेऊन वनवे म्हणजेच एकेरी मार्गे दोन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सिंधुदुर्ग- कोकण रेल्वे मार्गावर होणारी दिवाळी सणातील गर्दी लक्षात घेऊन वनवे म्हणजेच एकेरी मार्गे दोन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. कारवार ते बंगळुरू तसेच बंगळुरू ते मडगाव या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत.

कोकण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले की, कारवार ते सर एम. विश्‍वेश्‍वरय्या टर्मिनल बंगळुरूदरम्यान गाडी ही वनवे स्पेशल गाडी रविवार ३ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.तसेच सर एम. विश्‍वेश्‍वरय्या टर्मिनल बंगळूर ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी ही गाडी सोमवार ४ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. या दोन्ही वनवे स्पेशल गाड्या वीस डब्यांच्या एलएचबी श्रेणीतील असणार आहेत. केवळ दीपावली सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या