दिव्यांग खेळाडू ऑस्कर पिस्टोरियसची सुटका

प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिकेचा दिव्यांग खेळाडू ऑस्कर पिस्टोरियस याला शुक्रवारी पॅरोलवर सोडण्यात आले. आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता. शुक्रवारी पहाटे त्याला प्रिटोरिया येथील सुधारगृहातून सोडण्यात आले.
ऑस्कर पिस्टोरियस हा दक्षिण अफ्रिकेचा दिव्यांग खेळाडू आहे. त्याने २०११ च्या पॅराऑलिंपिकमध्ये अनेक पदके जिंकली होती. आघाडीचा खेळाडू असलेल्या ऑस्करने त्याच्या प्रिटोरिया येथील घरी त्याची मैत्रिण आणि दक्षिण अफ्रिकेतील मॉडेल रीवा स्टीनकँप हिची हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. आपण जाणूनबुजून ही हत्या केली नसून बाथरुम मध्ये कोणी अनोळखी असल्याच्या संशयावरुन गोळी झाडल्याचे त्याने सांगितले होते. या प्रकरणात त्याला १३ वर्ष ५ महिन्याची शिक्षा झाली होती. त्यातील ९ वर्षाची त्याची शिक्षा पूर्ण झाली आहे. आज सकाळी त्याला पॅरोल वर सोडण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top