दुबईच्या हॉटेलमध्ये २५ हजारांची सोन्याची फोडणी दिलेली दाल फ्राय

दुबई –
दुबईच्या बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये२४ कॅरेट सोन्याची फोडणी दिलेली दाल फ्राय मिळते. 24 कॅरेट गोल्ड दाल फ्राय असे नाव असलेली ही डिश लोकप्रिय झाली आहे. याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या दालफ्रायच्या एक वाटीची किंमत तब्बल २५ हजार रुपये इतकी आहे. या हॉटेलमध्ये लोक खास ही दालफ्राय खाण्यासाठी येतात.
या हॉटेलमध्ये फक्त दालफ्रायच नाही तर इतर पदार्थही मिळतात. त्यासोबत कॉकटेल,कॅप्युचिनो, बर्गर आणि इतर अनेक पदार्थांत सोन्याचा वापर करण्यात येतो. हॉटेलमधील इंटेरिअर डिझायनिंगमध्येही सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यामुळे या हॉटेलचे सौंदर्य उजळले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top