Home / News / दुबईत पायी चालणार्‍या ४४ हजार लोकांना दंड

दुबईत पायी चालणार्‍या ४४ हजार लोकांना दंड

दुबई- दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनादेखील वाहतूक नियमांचे पालन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दुबई- दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनादेखील वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. त्यानुसार दुबईत पायी चालणाऱ्या ४४ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या पादचाऱ्यांवर प्रत्येकी ४०० दिनारचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दुबईत पायी चालणाऱ्यांसाठी ‘जे वॉकिंग’ नावाचा कायदा आहे.’जे वॉकिंग’ म्हणजे परवानगी किंवा नियुक्त ठिकाणाशिवाय रस्ता ओलांडणे.जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल किंवा झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध किंवा क्रॉसिंगला परवानगी नसलेल्या ठिकाणाहून रस्ता ओलांडते. तेव्हा त्याला ‘जे वॉकिंग’ असे म्हणतात.’जे वॉकिंग’ कायदा मोडून परवानगीशिवाय रस्ता ओलांडल्यास किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास ४०० दिनार दंड आकारला जातो.गेल्या वर्षी जे-वॉकिंगमुळे आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३९ जण जखमी झाले होते. २०२३ मध्ये जे-वॉकिंगसाठी ४४ हजारहून अधिक लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या