दूधाला 50 रुपये हमीभाव द्यावा बीडमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता रोको

बीड
दूधाचे भाव घसरत असल्याने आक्रमक झालेले शेतकरी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. काल दूधाला 50 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बीड-परळी महामार्गावर बीडच्या जरूर फाट्यावर रास्ता रोको करत सरकारविरोधात जोरदार घोषणा केल्या. शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला.
बीडमधील दूध उत्पादक शेतकरी दूधाचे कॅन घेऊन बीडच्या जरूर फाट्यावर एकत्र जमले. या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधात आपल्या राग व्यक्त केला. आंदोलक शेतकऱ्यांनी मागणी केली की, पशू खाद्याच्या किमती 50 टक्क्यांपेक्षा कमी कराव्यात. पशुऔषधे जीएसटीतून मुक्त करावीत. प्रत्येक गावात आद्ययावत पशुवैद्यकीय प्रयोगाशाळा आणि पशुवैद्यकीय दावाखाना आसावा. हिंस्त्र प्राण्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाऊन शेतीला पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे रात्रीएवजी दिवसा वीजपुरवठा करावा. बीड तालुक्यातील बहुतांश गावात पाणी आणि चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा आणि पाणी देण्यासाठी निर्णय घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top