देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात! ६ ठार

जयपूर

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. भाविकांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

राजस्थानमधील सीकर येथील कुटूंबिय देवदर्शनासाठी रणथंबोरला निघाले होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून ते गाडीने प्रवास करत होते. माधोपूर परिसरात त्यांची गाडी आली असता एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाडीमधून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top