देवरिया हत्येप्रकरणी १५ अधिकारी निलंबित

लखनौ – उत्तर प्रदेशच्या फतेहपूर गावातील बहुचर्चित देवरिया हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई केली. योगी सरकारने या प्रकरणाशी संबंधित रुद्रपूर तहसीलचे एसडीएम योगेशकुमार गौर, जिल्हाधिकारी यांच्यासह १५ महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये दोन तहसीलदार, एक महसूल निरीक्षक, दोन लेखापाल, एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, एक मुख्य हवालदार आणि चार हवालदारांचा समावेश आहे.

याप्रकरणी सरकारने सादर केलेल्या अहवालात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संबधी अधिकाऱ्यांना फटकारले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील फतेहपूर गावात जमिनीच्या वादावरून ६ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सत्य प्रकाश दुबे यांनी आयजीआरएस अंतर्गत गावातील सामुदायिक जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींकडे पोलीस विभाग आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top