देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावर जाणार

इंदापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापुर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत फडणवीस इंदापूर विधानसभेच्या मुद्यावर कोणते भाष्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी अन्यथा आम्ही लोकसभेला काम करणार नाही अशी मागणी भाजपा युवानेत्या अंकिता पाटील ठाकरे व दुधगंगा दुधउत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केली होती. यासंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. अंकिताही हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि राजवर्धन त्यांचे पुत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये असणारा राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top