देशाचा आर्थिक वाढीचा दर १५ महिन्यांच्या निचांकी स्तरावर

नवी दिल्ली – देशाचा आर्थिक वाढीचा वेग मंदावला असून तो मागील १५ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे.एप्रिल ते जून २०२४-२५ या तिमाहीमध्ये आर्थिक वाढीचा दर ६.७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. केंद्र सरकारने काल जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.कृषी आणि सेवा क्षेत्राच्या निराशाजनक कामगिरीमुळे आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत चीनचा आर्थिक वाढीचा दरही मंदावला असून तो भारताहूनही कमी म्हणजे ४.७ टक्के नोंदविला गेला आहे. भारतीय आर्थिक वाढीचा यापूर्वीचा निचांक जानेवारी-मार्च या तिमाहीमध्ये नोंदविला गेला होता. त्यावेळी आर्थिक वाढ ६.२ टक्के होती.