देशातील पहिले दशावतारी नाट्यसंमेलन वेंगुर्ल्यात

वेंगुर्ला – देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन १५ आणि १६ डिसेंबर रोजी वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडणार आहे.

या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र डॉ.अशोक भाईडकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाट्ययरसिकांना मिळणार आहे.यामध्ये १५ रोजी ग्रंथदिंडी आणि दशावतार वेशभूषा स्पर्धा झाल्यावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यानंतर या संमेलनात दशावतारी नाटकातील खलनायकीचा बुलंद आवाज तुकाराम गावडे, विविधांगी गाणी आणि अख्यान देणारे कणकवलीचे भाई सामंत, पहिले आत्मचरित्र लिहिणारे गोव्याचे सुपुत्र मास्टर दामू जोशी,ज्येष्ठ रंगकर्मी जयसिंग राणे आणि महाराष्ट्र शासन कलादान पुरस्कार विजेते यशवंत तेंडोलकर यांचा विशेष सत्कार होणार आहे.त्याचप्रमाणे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दशावतार लंगार नृत्य स्पर्धा,अभिनय स्पर्धा तसेच विविध दशावतारी नाट्यप्रयोग आणि १६ डिसेंबर रोजी लोककला-चर्चासत्र, परिसंवाद,मुलाखत, सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे.तरी या पहिल्या दशावतारी नाट्य संमेलनात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top