दोडामार्गमध्ये २० जानेवारीला स्वामी समर्थ पादुकांचे आगमन

सिंधुदुर्ग- स्वामी समर्थ भक्त मंडळ दोडामार्गच्या पिंपळेश्वर देवस्थान येथील हॉलमध्ये शनिवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पालखीचे आगमन होणार आहे.हे मंडळाचे तेरावे वर्ष आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून ही स्वामी समर्थ महाराज यांची पादुका पालखी निघणार आहे.त्यानंतर दोडामार्ग राष्ट्रोळी मंदिर येथून दिंडीने स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत या पादुका पालखीचे दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थान हॉल येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होईल.त्यानंतर याठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतील. सातेरी भूमिका दिंडीपथक खैटवाडा कासारपाल गोवा हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.या दिवशी रात्री महाप्रसाद तसेच राष्ट्रीय नाट्यपुरस्कार विजेते ह.भ.प.सुशांत धोंड यांचे गुरू महिमा या विषयावर किर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग तालुका स्वामी समर्थ भक्त मंडळ यांनी केले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top