दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा

मुंबई
राज्यातील वेगवेगळ्या भागांत पुढचे दोन – तीन दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यात खान्देश – उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तपमानाचा हा परिणाम असून पुढील दोन ते तीन दिवसांत काही ठिकाणी पावसासह गारपिटीचीही पुन्हा एकदा शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे वातावरण अंशत: ढगाळ राहील आणि उन्हाचा चटका कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top