दौंडच्या हॉटेलबाहेर आंदोलन! संजय राऊतांना घेराव

दौंड- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ते दौंड येथील ज्या हॉटेलात उतरले होते त्यासमोर मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी संजय राऊत यांना दौंड तालुका सोडून जाण्यास सांगितले.
आज दौंड शहरात शिवसेना उबाठा गटाची बाईक रॅली होती. त्यानंतर नगरला कार्यक्रम होता. यासाठी खासदार संजय राऊत दौंडला आले होते. ते दुपारी 5 वाजेपर्यंत विश्रांती घेण्यासाठी दौंडच्या एका हॉटेलात उतरले होते. तिथून जवळच दौंड तहसील कार्यालयाबाहेर मराठा कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण सुरू होते.
संजय राऊत हे जवळच्याच हॉटेलात आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनी हॉटेलबाहेर जमण्यास सुरुवात केली. तोपर्यंत संजय राऊत यांची पत्रकार परिषदही पार पडली. नंतर मराठा आंदोलकांनी घोषणा देत त्यांना तत्काळ दौंड तालुका सोडून जाण्यास सांगितले. गावबंदी असताना तुम्ही का आलात असा सवाल त्यांनी केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top