धक धक गर्ल माधुरी नें वाढवली ‘धक धक “

मुंबई- गेले अनेक महिने धक धक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणुकीत उतरणार का? या चर्चा रंगू लागल्या आहेत, मात्र आता लवकरच माधुरी ची उमेदवारी जाहिर होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत… आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या मनात ली ‘धक धक’ वाढू लागली ती बॉलीवूडमधील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या चर्चेने. माधुरी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळु लागले आहेत घाटकोपर, असल्फा भागात माधुरी चे स्वागताचे पोस्टर झळकू लागले आहेत.
असल्फा भागात माधुरीतर्फे स्वागत असे पोस्टर झळकले आहे…तर घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये एका होर्डिंगवर श्री साई भक्त मंडळातर्फे माधुरीचा मोठा फोटो व 24डिसेंबर पासून होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेखा लावण्यात आली आहे.. सर्व साई भक्तांचे स्वागत ‘सौ. माधुरी दीक्षित-नेने’ असे लिहिण्यात आले आहे.
माधुरीकडून अद्याप या होर्डिंगबाबत काही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तसेच खरंच माधुरीने या होर्डिंगवर नाव देण्यासाठी परवानगी दिली का, याबाबतही साशंकता आहे. मात्र माधुरीचे नाव होर्डिंगवर आल्याने मंडळाचे नाव चर्चेत आले, त्याचबरोबर माधुरीच्या नावाच्या झालेल्या चर्चेला उधाण आले.
सध्या लोकसभेत भाजपच्या पूनम महाजन या मतदारसंघाचे नेतृत्व करत असून भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर समाधानी नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच महाजन यांच्या आधी काही वर्षे अभिनेता सुनील दत्त आणि त्यांच्या निधनानंतर दत्त यांची कन्या प्रिया यांनी मतदारसंघाचे नेतृत्व लोकसभेत केले. २०१४ पासून या मतदारसंघात खासदार म्हणून पूनम कार्यरत आहेत….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top