Home / Top_News / धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप;दमानियांकडून पुरावे सादर

धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप;दमानियांकडून पुरावे सादर

Dhananjay Munde and Anjali Damania मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार...

By: Team Navakal

Dhananjay Munde and Anjali Damania

मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दमानिया यांना समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलावले होते. त्याप्रमाणे त्यांनी आपले सर्व पुरावे विभागासमोर सादर केले आहेत.
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, कृषीमंत्री असताना मुंडे यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी फवारणी यंत्र, मेटलडीहाइड कीटकनाशक आणि कापसाच्या पिशव्या या पाच वस्तूंची खरेदी बाजारभावाच्या दुप्पट किंमतीने करून तब्बल १६० कोटी रुपयांचा अपहार केला. ही खरेदी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली होती. ज्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.त्यानुसार, राज्य कृषी विकास महामंडळाच्या वेबसाइटवरील दर आणि खरेदीच्या प्रत्यक्ष दरातील तफावत त्यांनी उघड केली. यासंबंधीचे पुरावे त्यांनी एसीबीकडे सादर केले असून १० जून रोजी त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. आता सर्व काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे असे दमानिया म्हणाल्या.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या