नवी दिल्ली
तिबेटचे अध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांना रविवारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कार्डिओ-न्यूरो सेंटरच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले असून ते कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ.राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली आहेत, असे वृत्त काल पसरले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केला जात होती. मात्र आता एम्सने हे वृत्त फेटाळून लावले आहे. दलाई लामा यांना शनिवारी किंवा रविवारी एम्समध्ये आलेले नाहीत, असे एम्स रुग्णालयाने सांगितले आहे.