Home / News / धारगळच्या उड्डाणपुलासाठी ३४.२१ कोटींची निविदा जारी

धारगळच्या उड्डाणपुलासाठी ३४.२१ कोटींची निविदा जारी

पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६६ वर धारगळ येथे उड्डाणपुल उभारला जाणार आहे. हा उड्डाणपूल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६६ वर धारगळ येथे उड्डाणपुल उभारला जाणार आहे. हा उड्डाणपूल बांधण्यासाठी ३४.२१ कोटी खर्चाच्या कामाची निविदा रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे. तसेच यातील पात्र कंपनीला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

पेडणे तालुक्यातील बार्देश, धारगळ दोनखांब येथील महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू असते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामसभेत वारंवार केली होती. या मागणीसाठी संपूर्ण त्यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा धारगळ पंचायत मंडळाने दिला होता. त्याची दखल अखेर राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी आता रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने उड्डाणपूल बांधण्यासाठी ३४.२१ कोटी खर्चाच्या कामाची निविदा जारी केली आहे. या कामासाठी कंपन्यांना २० डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने निविदा जारी करता येणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या