धारावी प्रकल्पाचे ट्वीन मॅपिंग तंत्रज्ञानाने नकाशे तयार होणार

*’अदानी’कडून जेनेसिस
इंटरनॅशनलची नियुक्त

मुंबई – भारतातील नकाशे बनवणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेनेसिस इंटरनॅशनलची अदानी समूहाच्या पोर्टसमाऊथ बिल्डकॉन प्रा.लिमिटेडला ‘डिजिटल ट्वीन मॅपिंग टेक्नॉलॉजीसाठी नियुक्ती केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी हे काम केले जाईल. हे काम २२ कोटी रुपयांचे आहे.

हा प्रकल्प नऊ महिन्यांचा असून त्यातून धारावीचे चित्र बदलणार आहे.कंपनीचे ‘ऑयस्टर ३ डी मॅप’ हे नावीन्यपूर्णता व अचुकतेसाठी वापरले जातात.या प्रकल्पात हे नकाशे महत्त्वपूर्ण ठरतील. जिनेसिसने सर्व्हे ऑफ इंडियाशी करार केल्यानंतर हे धारावीचे कंत्राट झाले. यात ३ डी डिजिटल ट्वीन मॅपिंग नकाशे केले जातील. सरकारी खासगी भागीदारीतून पहिल्यांदाच ३ डी डिजिटल ट्वीन मॅपिंगचा प्रकल्प राबवला जात आहे.

जिनेसिस इंटरनॅशनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साजीद मलिक म्हणाले की, डिजिटल ट्वीन मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय आव्हानात्मक परिसरात केला जातो. सामाजिक व वित्तीय सर्वकषतेमुळे या परिसरातील जनतेच्या जीवनाचा कायापालट होतो. यापूर्वी भारतात जिनेसिसने डिजिटल ट्वीन.मॅपिंगचा प्रयोग जयपूर,अयोध्या, अहमदाबाद, सुरत शहरात केला आहे. मात्र, संपूर्ण देशासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. मलिक म्हणाले की, कंपनीने यापूर्वी डिजिटल ट्वीन मॅपिंगचे काही काम एसआरए प्राधिकरणासाठी केले आहे.मात्र,धारावीसाठी हे काम करणे पहिल्यांदाच होत आहे. आम्हाला हे काम ९ महिन्यांत संपवायचे आहे.

दरम्यान,डिजिटल ट्वीन मॅपिंगमुळे इमारती, वाहने, मशिन्स, कोणते व्यवसाय या भागात येणार याचे चित्र आभासी पद्धतीने तयार केले जाते. मालमत्तेची एक समान आभासी प्रत तयार करणे आणि त्याच्या कार्यप्रदर्शनाचे निरीक्षण करणे, विविध परिस्थितींचे अनुकरण करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी डेटाचे विश्लेषण करणे आदींचा वापर केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top