धावत्या डेक्कन क्वीनमधून उतरताना २ भावांचा अपघात! एक जागीच ठार

ठाणे – कल्याण रेल्वे स्थानकात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या धीम्या वेगात असलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून उतरताना दोघेजण खाली कोसळले. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी दोघेही भावंड असल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी ९:३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पुण्यावरून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सकाळी ९:३० च्या सुमारास कल्याण स्टेशनवर येते. यावेळी एक्स्प्रेसचा वेग काहीसा कमी होता. त्यादरम्यान काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा तर काही जण उतरण्याचा प्रयत्न करतात. या एक्स्प्रेसबाबत हा प्रकार नेहमी घडतो. आजही तसाच प्रयत्न पुण्यावरून आलेल्या दोन भावांनी केला. कल्याण स्टेशनवर उतरताना दोघेही खाली कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. या दुर्घटनेनंतर स्टेशनवरील हमालांनी जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top