धुके दूर करण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रथमच कृत्रिम पावसाचा वापर

लाहोर

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच धुके दूर करण्यासाठी कृत्रिम पावसाचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने संयुक्त अरब अमिरातीकडून आलेल्या पावसाचा वापर करून लाहोरमधील धुके दूर केले. याबाबत पंजाबचे कार्यवाहक मुख्यमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, हा प्रयोग लाहोरमधील १० भागात करण्यात आला आणि तो यशस्वी झाला.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत लाहोरचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांमध्ये कमी दर्जाच्या डिझेलच्या धुरामुळे आणि हंगामी पीक जाळण्याच्या धुरामुळे पाकिस्तानमधील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत होते. पाकिस्तानने या पावसासाठी ४६ फ्लेअर असलेली दोन विमाने वापरली. ही विमाने संयुक्त अरब अमिरातीने भेट दिली. दरम्यान, लाहोरमधील हवेच्या दर्जाची पातळी १९२ होती, मात्र आता कृत्रिम पावसामुळे हवेच्या दर्जात थोडी सुधारणा झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top