धुळ्यात बसला अपघात २० प्रवासी जखमी

धुळे :

जिल्ह्यातील शिंदखेडा जवळ आज सकाळी एका खाजगी बसचा भीषण झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेऊन युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू केले.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे-शिरपूर दरम्यान नरडाणा (ता.शिंदखेडा) शिवारातील जुन्या टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात लहान मुलांचा देखील समावेश आहे. नरडाणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. यानंतर जखमी प्रवाशांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top