‘धूम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन

मुंबई- बॉलिवुडमधील ‘धूम’ आणि ‘धूम २’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचे आज रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.ते ५७ वर्षांचे होते. आज सकाळी मॉर्निग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

संजय गढवी हे अतिशय प्रभाववंत दिग्दर्शक होते.ते मुंबईतील अंधेरी येथील ग्रीन एकर्स बिल्डिंगमध्ये राहत होते.त्यांना कोणताही आजार नव्हता.ते पूर्ण निरोगी होते. त्यांची मुलगी संजना गढवी यांनी सांगितले की,आज सकाळी ते लोखंडवाला बॅकरोडमध्ये मॉर्निग वॉक करत होते. त्यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका आला.त्यांना तत्काळ कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले.मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांच्या निधनानंतर अनेक जणांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांनी धूम, धूम २,मेरे यार की शादी है, तेरे लिए, किडनॅप,अजब गजब लव्ह आणि ऑपरेशन परिंदे अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top