Home / News / धोकादायक प्रदूषणामुळे लाहोरचे जनजीवन ठप्प

धोकादायक प्रदूषणामुळे लाहोरचे जनजीवन ठप्प

लाहोर – आरोग्यास धोकादायक धूर, धूळ यामुळे श्वास घेण्यास अडचण होत असल्याने पाकिस्तानच्या लाहोर शहरातील व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही ठप्प...

By: E-Paper Navakal

लाहोर – आरोग्यास धोकादायक धूर, धूळ यामुळे श्वास घेण्यास अडचण होत असल्याने पाकिस्तानच्या लाहोर शहरातील व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले . प्रदुषणामुळे लाहोरच्या शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.लाहोर शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर झाले आहे. आज सकाळी लोहोरमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली होती. लाहोरच्या आसपासच्या गावांमध्ये कापणीनंतर शेत जाळण्यात येतात. भारतातील पंजाबमधूनही आलेल्या दुषित वाऱ्यांमुळे हे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बांधकामे बंद करण्यात आली आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts