Home / News / नंदुरबारमध्ये बिबट्या अखेर जेरबंद

नंदुरबारमध्ये बिबट्या अखेर जेरबंद

नंदुरबार- नंदुरबार नगरपालिका हद्दीतील मधुबन कॉलनीत गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत होते. दोन दिवसांपूर्वीही रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पाहावयास...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

नंदुरबार- नंदुरबार नगरपालिका हद्दीतील मधुबन कॉलनीत गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत होते. दोन दिवसांपूर्वीही रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पाहावयास मिळाला होता. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नंदुरबार वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. अखेर आज पहाटे नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, दुसरा बिबट्या अजूनही मुक्तपणे संचार करीत आहे. त्यालाही जेरबंद करा, अशी मागणी रहिवाशांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या