नरेंद्र दाभोलकर खून खटल्याचा आज निकाल

पुणे –
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून पुण्यातील विशेष न्यायालयात आज या खटल्याचा निकाल लागणार आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील —पुलावर दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आधी पुणे पोलीस मग सीबीआय असा तब्बल ८ वर्षे या हत्येचा तपास सुरू होता. सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांविरुद्ध आरोप निश्चित केले. यातील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे सध्या जामिनावर आहेत. अडीच वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यातील पहिले एक वर्ष न्या. एस. आर. नावंदर यांच्यासमोर, तर नंतर न्या. पी. पी. जाधव यांच्या समोर सुरू होती. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी एकूण २० साक्षीदार तपासले, बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, सुवर्णा आढाव, वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दोन साक्षीदार तपासले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top