नर्मदा नदीतून १२० किमीची क्रूझ लवकरच सुरू होणार

नागपूर: मध्य प्रदेश सरकार नर्मदा नदीवर क्रूझ पर्यटन सुरू करणार असून १२० किलोमीटरची सफर घडवली जाणार आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण आणि गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारांतर्गत कोलकाता येथून दोन तरंगत्या जेटी ( पॉन्टून ) मध्यप्रदेशातील कुक्षी येथे पाठविण्यात आल्या आहेत. या पर्यटनासाठी एकूण चार जेटींचा वापर केला जाणार आहे.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मध्य प्रदेश पर्यटन विभागाद्वारे एमपीचा क्रूझ पर्यटन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पॉन्टून (फ्लोटिंग प्लॅटफॉर्म) घाट किंवा किनाऱ्यावर बसवले जातील. पॉन्टून बुडत नाहीत आणि एकाच वेळी अनेक लोकांचे वजन वाहून नेऊ शकते. या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी क्रूझचा आनंद घेता येणार आहे.

प्रस्तावित योजनेनुसार, मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथील एकात्मा धाम (स्टॅच्यू ऑफ वननेस) ते गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत ही क्रूझ चालवली जाईल. करारानुसार, भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण, गुजरात आणि गुजरातला प्रत्येकी एक अशा दोन तरंगत्या जेटी देणार आहे. मध्य प्रदेशचा जेट्टी आधीच पाठवण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश आणि गुजरात दरम्यान नर्मदेवरील क्रूझ जहाजांची हालचाल कोणत्याही अडथळ्याविना होईल, असे करारात नमूद केले आहे.

कुक्षी येथून पर्यटकांना रस्त्याने ओंकारेश्वर येथील स्टॅच्यू ऑफ वननेस येथे नेले जाईल. तिथून पर्यटकांना महेश्वर, मंडलेश्वर आणि मांडू येथे नेले जाईल. यासाठी एकूण चार जेटी उभारल्या जाणार असून दोन मध्यप्रदेशातील चंदनखेडी-कुक्षी आणि सक्रजा-अलिराजपूर येथे आणि दोन हणफेश्वर (छोटा उदयपूर) आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरातमधील केवडिया) येथे असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top