Home / News / नवनीत कावतांच्या आश्वासनानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण स्थगित

नवनीत कावतांच्या आश्वासनानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण स्थगित

बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची परळीत तहसील कार्यालय परिसरात ऑक्टोबर २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. या...

By: Team Navakal

बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची परळीत तहसील कार्यालय परिसरात ऑक्टोबर २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट असल्यामुळे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे बेमुदत उपोषण करणार असा इशारा दिला होता. ३० जून पर्यंत आरोपींना अटक करू असे आश्वासन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिले. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण स्थगित केले आहे.
याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तीन वेळा उपोषण केले होते. तेव्हाही बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांना वेळ दिला होता.
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर विश्वास ठेवून मी उपोषण स्थगित करत आहे. कावत यांनी मला ३० जूनपर्यंत आरोपींना अटक करतो असे आश्वासन दिले आहे. त्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पुण्यात पथक पाठवले होते पण त्यांना आरोपी सापडला नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या