नवरात्रोत्सवात माहूरला जाण्यासाठी विशेष बससेवा

नांदेड

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांची सोय व्हावी म्हणून यंदा या एसटी महामंडळाने १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान माहुरसाठी विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बस यवतमाळ ते माहूर या मार्गावर धावणार आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रेणुका मातेच्या दर्शनासाठी आता भक्तही आतुर झाले आहेत. त्यातच बसच्या फे-या वाढविल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top