नवरात्रोत्सवासाठी मंडळांना मंडप परवानगी बंधनकारक

ठाणे- ठाणे महानगरपालिकेने नवरात्रोत्सवाच्या काळात उभारण्यात येणाऱ्या मंडप, लाऊड स्पीकर यांच्यासह विविध परवानग्या घेणे मंडळांना बंधनकारक केले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातदेखील मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १५३ मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीने १०५ अर्ज प्राप्त झाले असून ऑनलाईन पद्धतीने केवळ ४८ मंडळानी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ ४ मंडळांना महानगपालिकेने परवानगी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top