नवरात्र सोहळ्यासाठी मानाचे उंट,घोडे जोतिबा डोंगरवर दाखल

कोल्हापूर – यंदा जोतिबा डोंगरावर होणार्‍या नवरात्रोत्सवाची तयारी जोमाने सुरू झाली आहे. या सोहळ्यासाठी मानाच्या उंट आणि घोड्याचे आगमन नुकतेच डोंगरावर झाले आहे.१५ ऑक्टोबर हा नवरात्रीच्या पहिला दिवस असून यादिवशी मुख्य मंदिरात घटस्थापना होणार आहे.

या नवरात्र उत्सवासाठी येत्या सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी पाकाळणीने मंदिराची स्वच्छता केली जाणार आहे. तर १५ ऑक्टोबर रोजी मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी, ढोल,सनई,शिंग आणि ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होणार आहे.विशेष सलग ९ दिवस जोतिबा ते यमाई मंदिर मार्गावरून धुपारती निघते.यंदा २१ ऑक्टोबर रोजी जोतिबाचा जागर आहे.

दरम्यान,गेले चार महिने थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून हे मानाचे घोडे आणि उंट डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते या गावी होते. या ठिकाणी असणाऱ्या थट्टीच्या इमारतीत त्यांनी विश्रांती घेतली होती.त्यांच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी कायम स्वरूपी आहेत.या प्राण्यांना दररोज सुग्रास तसेच हिरवे,वाळलेले गवत देण्यात येत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top