Home / News /  नवीन गाडी खरेदी करायची आहे? 6 लाखांच्या बजेटमध्ये येतेय मारुतीची ‘ही’ सर्वात लोकप्रिय कार

 नवीन गाडी खरेदी करायची आहे? 6 लाखांच्या बजेटमध्ये येतेय मारुतीची ‘ही’ सर्वात लोकप्रिय कार

Maruti Alto K10: भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये येणाऱ्या कारला विशेष मागणी आहेत. यात प्रामुख्याने ऑल्टो के0 या मारुती सुझुकीच्या कारचा...

By: Team Navakal

Maruti Alto K10: भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये येणाऱ्या कारला विशेष मागणी आहेत. यात प्रामुख्याने ऑल्टो के0 या मारुती सुझुकीच्या कारचा समावेश आहे. अवघ्या 4 लाख रुपयांपासून सुरुवाती किंमत असणाऱ्या या कारला खरेदी करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याविषयी जाणून घ्या.

ऑल्टो के10 ची किंमत

मारुती ऑल्टो के10 ची किंमत 4.09 लाख ते 6.05 लाख रुपये आहे. ही कार चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये येतो. यामध्ये 1-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.याशिवाय, CNG व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल मॅन्युअल 24.39 kmpl आणि सीएनजी व्हेरिएंट 33.85 km/kg माइलेज देते. 

मारुती ऑल्टो के10 चे फीचर्स

या कारला तुम्ही 6 वेगवेगळ्या रंगात खरेदी करू शकता. यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली. याशिवाय, कीलेस एन्ट्री, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स मिळतील. 

कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रिव्हर्स कॅमेरा, ABS-EBD आणि रियर पार्किंग सेन्सर देखील दिले आहे. तुम्ही जर कमी किंमतीत येणारी कार शोधत असाल तर ऑल्टो के10 चा विचार करू शकता. 

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या