Home / News / नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींचा विरोध

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींचा विरोध

सातारा- राज्यात महत्त्वाकांक्षी असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाने सध्या गती घेतली आहे. या प्रकल्पानुसार महाबळेश्वरच्या शेजारी नवीन महाबळेश्वर गिरिस्थान उभारण्यात येणार...

By: E-Paper Navakal

सातारा- राज्यात महत्त्वाकांक्षी असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाने सध्या गती घेतली आहे. या प्रकल्पानुसार महाबळेश्वरच्या शेजारी नवीन महाबळेश्वर गिरिस्थान उभारण्यात येणार असून या भागाची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत ही विकास योजना स्थानिकांसमोर मांडली जाणार आहे, परंतु या प्रकल्पाला निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी विरोध करीत आहेत.

राज्यातील प्रमुख गिरिस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला दरवर्षी १८ लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे . महाबळेश्वरवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरिस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसवण्यात येईल. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश असणार आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ७३८ चौ. किमी. क्षेत्रासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे .

Web Title:
संबंधित बातम्या