नांदेड जिल्ह्यात उष्माघाताने ३२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

नांदेड- नांदेडमधील तापमान ४१ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. याच कडक उन्हामुळे नांदेड जिल्ह्यातील
पहिला बळी गेला आहे. जिल्ह्यातील हिमायतनगर येथे परमेश्वर सुरजवाड (३२) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला.

हिमायतनगर शहर आणि परिसरात गेल्या १५ दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे.सकाळी ९ वाजल्यापासूनच कडक उन्हाचे चटके बसत आहेत. या कडक उन्हातच हिमायतनगर शहरात राहणारा परमेश्वर हा कामासाठी दिवसभर घराबाहेर होता. सायंकाळी घरी आल्यावर परमेश्वरची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून प्राथमिक औषधोपचार घेतले. सकाळी पुन्हा त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याने हिमायतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top