नागपुरात गारपीट जोरदार पाऊस

नागपूर
नागपुरमध्ये आज दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. यावेळी सोसाट्याचा वारा सुटला त्याचप्रमाणे काही भागात गारपीट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर हे उकाड्याने त्रस्त झाले होते. नागपूरचे तापमानही ४३ अंश सेल्सियसवर गेले होते. उन्हाळ्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी नागपूरात अचानक पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. भर उन्हाळ्यात आलेल्या पावसाने नागरिकांना काहीसे हायसे वाटले. त्यामुळे रात्री उष्णतेत वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या देखील तुटल्या. वाढत्या उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top