नागपूर विभागातील ब्लॉकमुळे भुसावळमार्गावरील १४ एक्स्प्रेस रद्द

नागपूर

नागपूर विभागातील कन्हान रेल्वे स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने १४ डिसेंबरपर्यंत भुसावळमार्गे मुंबई, पुणे आणि सुरतकडे जाणाऱ्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एक्स्प्रेस, सीएसएमटी- हावडा एक्स्प्रेस, ओखा-शालिमार एक्स्प्रेस, शालिमार – ओखा एक्सप्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-हटिया एक्स्प्रेस, मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस, सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस, एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, पुरी-अजमेर एक्स्प्रेस,अजमेर-पुरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top