Home / News / नाशिकमधून आणखी एक’कांदा एक्स्प्रेस’ दिल्लीत

नाशिकमधून आणखी एक’कांदा एक्स्प्रेस’ दिल्लीत

नवी दिल्ली – देशात किरकोळ बाजारात कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतीवर लगाम लावण्यासाठीचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा घेऊन...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – देशात किरकोळ बाजारात कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतीवर लगाम लावण्यासाठीचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा घेऊन दुसरी विशेष मालवाहू रेल्वेगाडी नाशिकहून काल दिल्लीत दाखल झाली.हा कांदा सरकार वाजवी भावाने बाजारात उपलब्ध करून देणार आहे,असे रेल्वेचे (उत्तर) मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितले. सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांच्या हिताचा आहे,असे दावाही उपाध्याय यांनी केला.

Web Title:
संबंधित बातम्या