नाशिकमध्ये धावत्या एसटीला अचानक आग! जीवितहानी नाही

नाशिक

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर धावत्या बसला अचानक आग लागली. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले. सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस निघाली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर या बसने अचानक पेट घेतला. खिरमणी फाट्यावर बस थांबल्यानंतर आग आणखी वाढली.

आग लागल्यानंतर बस चालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग विझली नाही. त्यानंतर अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top