नाशिकमध्ये पाण्याची टाकी साफ करताना तरुणाचा मृत्यू

नाशिक :

पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलची पाण्याची टाकी स्वच्छ करीत असताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

भुषण दिगंबर शिनकर (३०) हा सोमवारी दुपारी दीड वाजता पाथर्डी फाटा येथील हॉटेल सुखसागरची पाण्याची टाकी आपला भाऊ विजय याच्यासोबत स्वच्छ करत होता.त्यावेळी त्‍याला वीजेच्या वायरचा शॉक लागला. त्याला उपचारासाठी नाशिक येथील वक्रतुंड रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून भुषणला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अतुल बनतोडे करीत आहेत. याबाबत पोलिसांनी विद्युत विभागाला पत्र देऊन माहिती मागवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top