नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग!

नाशिक

नाशिकरोड परिसरातील आनंद कॉम्प्लेक्स समोर सुभाष रोड, सोमनाथ बाबा चाळ येथील बारदानाच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीचे मोठमोठे लोट परिसरात पसरले होते. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. अन्वर उमर खान, सुकडू उमर खान, बारदान वाले यांच्या मालकीचे हे गोदाम आहे.

ही घटना आज सकाळी ९:३० च्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग मोठी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top