Home / News / नाशिकहून जयपूरसाठी लवकरच विमानसेवा

नाशिकहून जयपूरसाठी लवकरच विमानसेवा

नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार आहे.

नाशिकहून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवासासाठी रेल्वेने किमान २४ तास लागत असतात. विमानाने हे अंतर केवळ तीन तासात पार करता येणार आहे. जयपूरहून नाशिकसाठीचे विमान सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी निघणार असून ते दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नाशिकला पोहोचेल. नाशिकहून हेच विमान २ वाजून ४० मिनिटांनी निघून संध्याकाळी साडेपाच वाजता जयपूरला पोहोचेल. या विमानसेवेचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या