नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीनाकडून आईची हत्या

बंगळूरू –
आईने नाश्ता देण्यास नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलाने राग अनावर होऊन डोक्यात रॉड घालून आईची हत्या केली. त्यानंतर मुलाने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

ही घटना शुक्रवारी कर्नाटकच्या मुलबागल शहरात शुक्रवारी घडली. अटक केल्यानंतर या अल्पवयीन मुलाचा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर आरोपीनी पोलीस ठाणे गाठले. या अल्पवयीन मुलाने वरिष्ठ अधिकार्याशी बोलण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने आईची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top