नाहयान कुटुंब जगात सर्वात श्रीमंत २५.३८ लाख कोटी रुपयांची संपत्ती

अहमदाबाद :

गुजरातमध्ये नुकतीच ‘व्हायब्रंट गुजरात समिट-२०२४’ पार पडली. या परिषदेत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. अहमदाबादमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत रोड शोही केला. ही ‘नाहयान रॉयल फॅमिली’ हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे २५.३८ लाख कोटी रुपये आहे.

अबुधाबीच्या अमिरातीचे राजघराणे २०२३ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले. या कुटुंबाने याबाबतीत वॉलमार्ट इंकचे मालक वॉल्टन कुटुंबाला मागे सोडले. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे सध्या या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांच्या कुटुंबाची सुमारे २५.३८ लाख कोटी रुपये आहे, तर वॉल्टन कुटुंबाची सुमारे १९.३१ लाख कोटी रुपये आहे.

वैयक्तिकरित्या टेस्लाचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मस्क यांची संपत्ती सुमारे १८.४६ लाख कोटी रुपये आहे. ही संपत्ती नाहयान कुटुंबाच्या तुलनेत कमी आहे.

नाहयान रॉयल फॅमिलीची संपत्ती भारतातील दोन सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांच्या एकूण संपत्तीच्या कितीतरी पटीने जास्त आहे. पहिल्या क्रमाकांवर असलेल्या मुकेश अंबानी कुटुंबाची संपत्ती ८.४ लाख कोटी रुपये आहे, तर गौतम अदानी कुटुंबाची संपत्ती सुमारे ७.६३ लाख कोटी रुपये आहे. दोघांची एकूण संपत्ती १६ लाख कोटी रुपये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top