नाहीतर अदानींच्या लोकांना रोखणार धारावी बचाव समितीचा इशारा

मुंबई
धारावी पूनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाल्याने आता लवकरच धारावीतील झोपड्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र धारावीतील प्रत्येक रहिवाशाला कोणत्याही परिस्थितीत 500 चौरस फूटांचेच घर मिळाले पाहिजे, अन्यथा धाराबीतील झोपड्यांचे सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अदानी समूहाच्या लोकांना धारावीत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा धारावी बचाव समितीने दिला.
धारावी प्रकल्पावर काम करणाऱ्या अदाणी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पूनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने पात्र झोपडीधारकांना साडेतीनशे चौरस फूट घर देण्याची घोषणा केली. मात्र धारावीतील रहिवाशांचा सरकारच्या या निर्णयाला विरोध असून कोणत्याही परिस्थितीत 500 चौरस फूटाचेच घर मिळाले पाहिजे. प्रत्येक झोपडीधारकाला पात्र ठरवून त्याला धारावीतच घर मिळावे यासाठी धारावी बचाव समिती आक्रमक झाली आहे. झोपड्यांचा सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अदानी समूहाच्या लोकांना धारावीत पाय ठेवू देणार नाही, जर सर्व्हे करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न झाला तर तो थांबवला जाईल. जोपर्यंत सर्व स्ट्रक्चर, पात्रतेचा जीआर निघत नाही, तोपर्यंत कोणताही सर्व्हे होऊ देणार नाही,अशी ठाम भूमिका धारावी बचाव समितीकडून घेण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top