Home / News / निकिता पोरवाल २०२४ ची फेमिना मिस इंडिया

निकिता पोरवाल २०२४ ची फेमिना मिस इंडिया

मुंबई – ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ चा किताब उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. काल रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेची...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

मुंबई – ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ चा किताब उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. काल रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मध्यप्रदेशच्या उज्जैनची निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर आता निकिता पोरवाल ‘मिस वर्ल्ड’ साठी तयारी करणार आहे. मिस इंडिया स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना निकिता म्हणाली की, “जेव्हा मी मागे वळून पाहते आणि आता ज्याठिकाणी पोहोचले याचा विचार करते, तेव्हा मला जाणवते की माझ्यात भविष्य घडवण्याची ताकद आहे”.
या सौंदर्यस्पर्धेच्या ग्रँड फिनाले वेळी अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिनेत्री संगीता बिजलानीचा धमाकेदार परफॉर्मन्स समारंभात पाहायला मिळाला. राघव जुयाल आणि अनुषा दांजेकर यांनीही रंगत वाढविली . यंदा परीक्षकांमध्ये अनुषा दांडेकरचा समावेश होता. देशभरातून त्यांनी 30 स्पर्धकांची निवड केली होती.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या